सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 17:24 IST2025-05-12T17:23:58+5:302025-05-12T17:24:35+5:30

आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते.

The condition of cooperative factories... Sharad Pawar's request to Chief Minister Fadnavis in front of Ajit Pawar | सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

Sharad Pawar and Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकप्रसंगी एकत्र दिसले आहेत. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र स्टेट कॉऑपरेटिव्ह बँक लि. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी काका-पुतणे एकाच मंचावर शेजारी-शेजारी बसलेले पाहायल मिळाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. 

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती
या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी अजित पवारांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहकारी कारखान्याबाबत एक विनंती केली. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील सगळे सहकारी कारखान्यांची काय अवस्था झाली आहे...आधी 80  टक्के सहकारी आणि 20 टक्के खासगी कारखाने होते. पण, आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी एक कमिशन अपॉइंट करुन आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करावा. नेमक्या काय अडचणी आहेत, ते पाहावे, असे शरद पवार म्हणाले. 

पवार पुढे म्हणतात, दख्खनचा उठाव इथ जो संघर्ष झाला, त्यावेळी इंग्रजांना शेतकऱ्यांचे दुःख समजले आणि त्यांनी उपाय योजना केल्या. त्यावेळी सावकार आणि व्यापारी यांच्याकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्याव लागत होते मात्र ते बंद झालं आणि सहकारातून त्यांना कर्ज मिळू लागले. राज्य सहकारी बँकेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पूर्वी साखर कारखानदारी नव्हती गूळाचा धंदा होता. एक व्यापारी गूळ करायचा आणि त्याचा त्या मार्केटवर दबाव असायचा, मात्र हे बदलण्यात आले आणि त्यावर पर्याय म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 
शरद पवारांच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात 50 टक्के सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. हे शरद पवारांनी सांगितले हे खरे आहे. साखर उद्योगात केवळ साखरेवर कारखाना चालू शकत नाही, आता त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय करावे लागणार आहे. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहिला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगिरभरती पाहिला मिळत आहे. सहकारातील महत्वाचा घटक म्हणजे सहकारी संस्था आहेत. आम्ही सेल्फ रीडेव्हलपमेंट ही योजना देखील आम्ही राबवत आहोत, अशी माहिती मुख्ममंत्र्यांनी दिली.

Web Title: The condition of cooperative factories... Sharad Pawar's request to Chief Minister Fadnavis in front of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.