शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने हमीभावाचा कायदा पारित करावा, राजू शेट्टींनी केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:52 IST

जयसिंगपूर : २०११ पासून देशातील शेतकरी किमान हमीभावाच्या लढाईसाठी दिल्लीच्या संसद मार्गावर लढाई लढतोय. मात्र व्यापारी धोरणापुढे व व्यवस्थेपुढे ...

जयसिंगपूर : २०११ पासून देशातील शेतकरी किमान हमीभावाच्या लढाईसाठी दिल्लीच्या संसद मार्गावर लढाई लढतोय. मात्र व्यापारी धोरणापुढे व व्यवस्थेपुढे शेतकऱ्यांचे शोषण सुरूच राहिले आहे. आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर, मक्का, भात विकू लागला आहे. यामुळे देशातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने तातडीने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एमएसपी गॅरंटी मोर्चाच्या वतीने दिल्ली येथील झालेल्या पत्रकार परिषदेत केली.शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागले आहेत. २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभावाच्या अभ्यासासाठी समिती गठित केलेली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या समितीने देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा पारित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अकरा वर्षांपासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी दुर्लक्ष करू लागले आहे. केंद्र सरकारच्या आयात, निर्यातीचे धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव मिळू लागल्यास देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल. अन्यथा गहू, साखर, तांदूळ निर्यात करणाऱ्या देशाला आता गहू आयात करण्याची वेळ आल्याने हेच शेतीविषयक धोरणांचे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी सरदार व्ही. एम. सिंग, जलपुरुष राजेंद्रसिंह, आमदार यावर मीर, बलराज भाटी, रोहित जाखर, पी. व्ही. राजगोपाल, केदार सिरोही यांच्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी