शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"विमानाचा तो भाग जसाच्या तसा, मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? ११००० सेल्सिअसच्या आगीतही...!"; अजितदादांच्या अपघातासंदर्भात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:37 IST

Jitendra Awhad on Ajit Pawar Plane Crash : ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, विमानाचा तो भाग जसाच्या तसा होता. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. मग तो जळाला कसा? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही नेत्यांकडून विविध प्रकारच्या शंका, संशय व्यक्त केले जात आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विमानातील ब्लॅक बॉक्स संदर्भात संशय उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, विमानाचा तो भाग जसाच्या तसा होता. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. मग तो जळाला कसा? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, "मला सर्वात आश्चर्य वाटतं म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, तो विमानाचा जो भाग आहे, तो जसाच्या तसा होता. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे, ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे, ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं की, ब्लॅक बॉक्स जळून गेला. माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच की, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो?" 

"रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य" -"यामुळे, रोहित पवार ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कुणाची आहे? कंपनीत पैसे कुणाचे आहेत? ते विमान किती तास उडलं होतं? त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का? डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का? डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? ही कंपनी कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली चालते? हे सर्व प्रश्न आता आलेना समोर," असेही आव्हाड म्हणाले. 

आव्हाड पुढे म्हणाले, "जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढी चौकशी लांबवतील, जेवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील, की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्यास जागा निर्माण होत आहेत." 

"ब्लॅकबॉक्स जळून गेला, ही माझी सर्वात मोठी शंका..." -दरम्यान, काल मुख्यमंत्री असे म्हणाले की, अनेक जण शंका उपस्तित करत असले तरी, तुमच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर..., यावर बोलताना आव्हाड म्हणाले, "ब्लॅकबॉक्स जळून गेला, ही माझी सर्वात मोठी शंका आहे.  जगातल्या कुठल्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला, असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे, शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल, तर शंका या उपस्थित होणारच."

English
हिंदी सारांश
Web Title : Awhad questions black box's burning in Ajit Pawar's plane accident.

Web Summary : Jitendra Awhad raises doubts about the black box burning in Ajit Pawar's plane crash, questioning how it could burn in the fire when that part of the plane remained intact. He supports Rohit Pawar's demand for investigation into the company's ownership and DGCA's role.
टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस