ठाण्यात आईने दोन जुळया गतीमंद मुलांची हत्या करुन स्वत: केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 22:50 IST2017-09-09T20:32:56+5:302017-09-09T22:50:53+5:30

ठाण्याच्या कळवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन गतिमंद जुळ्या मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.

In Thane, a woman committed suicide by killing two twins and children | ठाण्यात आईने दोन जुळया गतीमंद मुलांची हत्या करुन स्वत: केली आत्महत्या

ठाण्यात आईने दोन जुळया गतीमंद मुलांची हत्या करुन स्वत: केली आत्महत्या

ठळक मुद्देदिव्यांग असलेल्या ७ वर्षीय जुळया मुलांची हत्या करीत, त्यानंतर तीने गळफास घेवून आत्महत्या केली.

ठाणे, दि. 9 - कळवा,खारेगाव या परिसरातील एका मातेने आपल्या दिव्यांग असलेल्या ७ वर्षीय जुळया मुलांची हत्या करीत, त्यानंतर तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये त्या मुलांच्या पालन-पोषण करताना, होणाऱ्या वेदना सहन होत नसल्याने आत्महत्या केल्याचे नमूद आहे. 

तसेच मुलांची हत्या नेमकी कशी केली याबाबत त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवाल आल्यानंतर पुढे येईल अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.  अनंत विहार काम्प्लेक्स येथे राहणाऱ्या अर्चना कदम (३२) असे आत्महत्या करणाऱ्या मातेचे नाव असून सार्थक आणि वरद असे त्या ७ वर्षीय जुळ्या दिव्यांग मुलांची नावे आहेत. कदम दाम्पत्यांचे स्वताचे घर असून अर्चना हिचे पती एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. 

आज घरात कोणी नसताना, तिने हॉलमध्ये आत्महत्या केली. याचदरम्यान, त्या मुलांना नेमके विष देवून किंवा गळा दाबून मारले. याबाबत समजू शकले नाही. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवाल आल्यानंतर त्यांच्या हत्येचे कारण पुढे येईल.अशी  माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम.बागवान यांनी दिली.

Web Title: In Thane, a woman committed suicide by killing two twins and children