ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 20:45 IST2021-06-15T20:44:07+5:302021-06-15T20:45:23+5:30
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू
ठाणे :ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २५ हजार ९७३ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३१ हजार ८४७ झाली आहे. शहरात ४ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९५० झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १४४ रुग्णांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ८७ रुग्णांची वाढ झाली असून ७ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ८ रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ४ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ५१ रुग्ण आढळले असून २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये ५ रुग्णांची नोंद असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ४४ नवे रुग्ण वाढले आहेत. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ४६२ झाली असून आतापर्यंत ११३६ मृत्यूंची नोंद आहे.