शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 07:16 IST

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणातील सत्ता समीकरणांवर प्रभाव पाडणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या मुंबई महानगर परिसरातील विधानसभेच्या ६७ जागांकरिता आज, बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान होत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत  मतदार कुणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, आदिती तटकरे आदी दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले आहे. त्यामुळे उद्धवसेनेने या निवडणुकीत भावनिक मुद्याला हात घातला, तर शिंदेसेने विकासकामे आणि लाडकी बहीण योजनेच्या आधारावर मते मागितली आहेत. यापैकी कुणाला मुंबई महानगरातील मतदारांची पसंती मिळते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही वर्षांत शिवसेनेला मागे टाकून भाजपने या परिसरात आपले हात-पाय पसरले. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भाजप किती जागा मिळवतो आणि मोठा भाऊ होतो का, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर असल्याने काँग्रेसला जागावाटपात तडजोड करावी लागली. त्याबद्दल या पक्षात नाराजी होती. त्याचा कसा आणि किती परिणाम होतो, हेही उद्याच्या मतदानातून दिसणार आहे. 

मनसे फॅक्टर किती परिणाम करणार?

- मनसेने लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्याविरोधात शिंदेसेनेने उमेदवार दिला. 

- त्यामुळे एकीकडे मनसे आणि भाजप यांचे सूत जुळलेले असताना दुसरीकडे मनसे व शिंदेसेना यांच्यात सुप्त संघर्ष दिसत आहे. त्याचा कसा आणि किती परिणाम होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. 

- अमित ठाकरे यांचे माहीम मतदारसंघातून होणारे राजकारणातील पदार्पण यशस्वी होणार किंवा कसे, याचा फैसला मतदार करतील. 

उत्सुकता, उत्कंठा, चिंता 

- वरळीतून आदित्य ठाकरे पुन्हा विजयी होतात किंवा कसे याची, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडीत उद्धवसेनेने खेळलेले दिघे कार्ड प्रभावी ठरणार की निष्प्रभ होणार, याची उत्सुकता आहे. 

- रवींद्र चव्हाण डोंबिवलीचा बालेकिल्ला राखताना किती मताधिक्य मिळवतात? तर मुंब्रा- कळव्यात जितेंद्र आव्हाड यांना त्यांचे शिष्य नजीब मुल्ला किती आणि कसा शह देतात नाही, याची चर्चा आहे. 

- बेलापूर आणि ऐरोली हे मतदारसंघ भाजप व शिंदेसेनेतील बंडखोरीमुळे गाजत आहेत. तेथे गणेश नाईक, त्यांचे पुत्र संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांचे भवितव्य पणाला लागले आहे. 

- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाल्याने नालासोपाऱ्याची निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Thackerayअमित ठाकरे