शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics:“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:41 IST

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत, श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच ठिकाणी, त्याच मैदानावर सभा घेतली. दोन्ही सभांना किती गर्दी झाली होती, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर फिरत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. 

शिंदे गटाने ठाकरे गटाला या सभेतून जशास तसे उत्तर दिले. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून फक्त आदेश देणाराच मुख्यमंत्री नाही, असा खोचक टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर विविध मुद्द्यांवरून सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेवर आता सुषमा अंधारेंनी निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

गर्वाचे घर खाली असते, त्यांना लोकच उत्तर देतील

खेड येथील ही सभा उद्धव ठाकरे यांना उत्तर देणारी असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर बोलताना, त्यांचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहीत आहे. गर्वाचे घर खाली असते. त्यांना लोकच उत्तर देतील, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला. तसेच मी गद्दार नाही खुद्दार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावर, गेल्या दहा वर्षातला हा अत्यंत सुंदर आणि दर्जेदार विनोद आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

दरम्यान, उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. ज्या अनिल जयसिंघानीच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असल्याचा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला. जयसिंघानी यांची जवळीक कोणाची? याचा तपास झालाच पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे