शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

“२०२४साठी २१ मंदिरांचा वापर होईल, धर्म-देवळे-धार्मिक तणाव हीच भाजपची त्रिसूत्री, अफूच अफू…!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 08:01 IST

Thackeray Group Vs BJP Modi Govt: उद्धव ठाकरेंमुळे कोरोना रोखला गेला असे सांगताना, मंदिरांची उभारणी करुन भाजपने १४० कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले, अशी टीका करण्यात आली.

Thackeray Group Vs BJP Modi Govt: अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळ्या वाजवून, घंटा बडवून कोरोना पळाला नाही. महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला. गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली. तेथे धर्म होताच, पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले. २०२४ साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे. २१ मंदिरांचा वापर त्यासाठी होईल. भक्तांनी आता सावध राहावे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

देशात असंख्य प्रश्नांचे थैमान सुरू आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे-धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. २०२४ हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळ्या दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून १३ हजार कोटी रुपये खर्च करून देशात २१ भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत. मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपला साधली आहे व त्यासाठी बागेश्वर बाबा, मनोहरपंत भिडे, रामरहिम असे बाबा लोक त्यांनी हाताशी ठेवले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. 

फक्त मंदिरांची उभारणी करून देशाची प्रगती होत नाही

फक्त मंदिरांची उभारणी करून देशाची प्रगती होत नाही.  शिक्षण, उद्योग, विज्ञान, संरक्षण उत्पादन, कला, सामाजिक न्याय व सुधारणा यातही भारत देश अग्रेसर असावा. मंदिरे ही मनःशांतीसाठी आहेत. विज्ञान हे प्रगतीसाठी आहे. भारत सरकार २१ मंदिरांच्या विकासावर व धार्मिक कॉरिडॉरवर मोठय़ा प्रमाणात काम करीत आहे. त्यात विज्ञान नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. २०१४ च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील. २०१४ साली सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. अनेक घोषणा मोदी सरकारने चुलीत घातल्या आहेत आणि २१ मंदिरांची उभारणी करून भाजपने १४० कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. 

दरम्यान, देशात संरक्षण सामग्री बनत नाही. राफेलसारखी लढाऊ विमाने फ्रान्स-अमेरिकेकडून हजारो कोटींना विकत घ्यावी लागतात हे काही आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही. देशात गोमांस, समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, हनुमान चालिसा अशा विषयांवर धार्मिक तणाव निर्माण करायचे व त्या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुकांना सामोरे जायचे हे भाजपचे नित्याचेच धोरण. त्यात आता मंदिरांची भर पडली, या शब्दांत ठाकरे गटाने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकावर टीकास्त्र सोडले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा