शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:45 IST

Sanjay Raut News: महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून चर्चा, बैठका सुरू आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, ते जाहीर करावे, असा आग्रह धरला आहे. तर महाविकास आघाडीतील नेते याला दाद देताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण मुख्यमंत्री होणार, यावर चर्चा होऊ शकेल, असे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते म्हणत आहेत. यातच ज्याच्या जास्त जागा असतील, त्याचाच मुख्यमंत्री असे कोणतेही सूत्र महाविकास आघाडीत नसल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सलग चार दिवस महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते जागा वाटपासाठी बसलो. जो जिंकेल तो त्या जागेवर लढेल हे आमचे सूत्र आहे. २८८ जागांवरती नजर देताना प्रत्येक घटकाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. चार दिवस बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात. पुन्हा बसावे लागेल. प्रत्येकाची स्वातंत्र मत असतात, पण हे जागा वाटप शांततेत आणि  सहज पार पडेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही

ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे कोणतेही सूत्र ठरले नाही आणि ठरणार नाही. महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच आमचे एकच सूत्र आहे एकत्र लढायचे आणि आमचे सरकार आणायचे, त्यासाठी कोणाला त्याग करावा लागला तरी चालेल. दोनशे जागांवर आमच्यामध्ये संमती झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

दरम्यान, आम्ही कोणताही फॉर्म्युला समोर ठेवून निवडणुका लढत नाही. लोकसभेला कुठला फॉर्मुला नव्हता. विधानसभेला आम्ही अशाच प्रकारे कुठल्याही फॉर्मुलाविना निवडणूक लढू. आघाडीच्या जागावाटप आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्याच जागा लढू असे होऊ देणार नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी जागावाटप पूर्ण होईल. जागावाटप पूर्ण झाल्यावर जाहीरनाम्यावर बैठका घेऊ किंवा एकत्रित प्रचार कसा करता येईल यावर काम करू, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी