...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:47 AM2023-10-05T10:47:21+5:302023-10-05T11:30:50+5:30

राजभवनाचा राजकीय आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? असा सवाल त्यांनी विचारला.

Thackeray group MP Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis | ...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

...या पलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली – देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारण मी कधीही पाहिला नाही हे मला दुर्दैवाने म्हणावे लागतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहचेल अशी विधाने करायची. यापलीकडे गेल्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले नाही. कधी उद्धव ठाकरे, कधी शरद पवार यांच्या प्रतिमेला तडे जातील अशी वक्तव्ये करायची. तुम्ही गेल्या वर्षभरात काय केले हे सांगा अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, सिंचन घोटाळ्यातील आरोप ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाले ते तुमच्यासोबत सत्तेत आहेत. शिंदे आणि त्यांच्या लोकांवर ईडी-सीबीआय कारवाई सुरू आहे ते तुमच्यासोबत आहेत. जरा त्यांच्याविषयी बोला, त्यानंतर भूतकाळात काय घडले त्यावर बोला. महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरू आहे त्यावर बोला. तुमचा एक भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवला. त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व करत होता. राजभवनाचा राजकीय आणि गुंडाचा अड्डा त्याकाळात झाला होता. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? असा सवाल त्यांनी विचारला.

तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे, भाजपा हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागतात. या तडजोडी मूळ शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आहेत. मग महाराष्ट्र चोर दरोड्यांच्या हाती गेला तरी चालेल, महाराष्ट्राची इज्जत धुळीला मिळाली तरी चालेल. महाराष्ट्रात अनगोंदी अराजक निर्माण झाले तरी चालेल. देवेंद्र फडणवीस हे स्वत:चा अपमान स्वत: करतायेत. ज्यापद्धतीने तुमचे मातेरे आणि पोतेरे दिल्लीने केलंय आम्हाला त्याची लाज वाटते. तुमची दया येते अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केली.

दरम्यान, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथं आरोग्य यंत्रणेमुळे शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. फडणवीस यांच्या नागपूरातच २५ पेक्षा जास्त रुग्णांचा एका दिवसात मृत्यू झाला. हे सगळे सुरू असताना सत्तेतील तिन्ही पक्ष रुसवे-फुगवे यात अडकले होते. कुणाला पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ वाटप या गुंत्यात हे पक्ष अडकले आहे. महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरू आहे त्या वेदनेचे रेषाही यांच्या चेहऱ्यावर दिसले नाही. जिल्याचे पालकमंत्री बदलले, महामंडळ यापुढे सरकार जात नाही असा आरोप राऊतांनी महायुतीवर केला.

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.