शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले...भास्कर जाधवांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 15:35 IST

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - केलेल्या पापातून कुठेतरी मुक्तता मिळावी. सातत्याने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन त्यांनी केलेले पापानं मन खात असावं. तुमच्या सुपुत्राला आम्ही मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं हे आम्ही पाप केले. त्याबद्दल ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नाक घासत असावेत. त्याशिवाय त्यांच्याकडे श्रद्धा नाही, प्रेम नाही आणि आस्था नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासाठी भाजपा-शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. तत्पूर्वी मोदी मुंबई येण्याअगोदर शिंदे गटातील नेत्यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले त्यावरून भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं. भास्कर जाधव म्हणाले की, मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत. त्यात ते आता मुंबईत येतायेत याचा अर्थ मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. ज्या राज्यात, ज्या भागात निवडणुका असतात त्या डोळ्यासमोर ठेवूनच मोदी तिथे जातात अन्यथा इतर कधी ते जाताना दिसत नाहीत असा आरोप जाधवांनी केला. 

तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत. विशेष काळजी घेताना दिसले नाहीत. परंतु पूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी केलेले महापालिका उपक्रम, चांगली कामे उद्धाटन, भूमिपूजन करायचे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण करायचं ही मोदींची खासियत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातून मुंबई आणि महाराष्ट्राला काही मिळणार नाही असा आरोपही भास्कर जाधवांनी केला. 

मुंबई महापालिका हातातून जाणार, शिंदे गटाचा दावाज्या रस्त्याच्या निविदा निघाल्या नाहीत. कामाला सुरूवात झाली नाही. त्यात भ्रष्टाचार होतो? नेमका भ्रष्टाचार कधी होतो हे आदित्य ठाकरेंना समजणं गरजेचे आहे. आदित्य ठाकरेंना स्वप्न कसं पडलं हे माहिती नाही. ही मुंबई महापालिका आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. 

भरत गोगावले म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ४५० किमी रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे होणार आहेत. मागच्या सत्ताधाऱ्यांना का सुचलं नाही हे माहिती नाही. मुंबईतील रस्ते आता चांगले होतील. त्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे टीकाटीप्पणी करायची म्हणून करतात असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच पायाभरणी केली त्याचं उदाहरण दाखवा. तुमच्यात धमक नव्हती म्हणून कामे केली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा. आम्ही चुकलो तर ते सांगा पण चुकलो नसेल तर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. वर्षोनुवर्षे महापालिका ताब्यात असूनही सुशोभिकरण, रस्ते कॉक्रिंटीकरण दिसले नाही का? असा सवालही गोगावले यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे