शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

“लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती”; ठाकरे गटातील नेत्याचे संजय राऊतांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:22 IST

Thackeray Group Arvind Sawant News: निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे.

Thackeray Group Arvind Sawant News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. याला ठाकरे गटातील नेत्यांकडून समर्थन मिळताना दिसत आहे. 

मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणालेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना मोठे विधान केले आहे. 

लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती

लोकसभा आणि विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि त्रांगड होत असेल तर अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावे. स्वबळावर लढावे, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. शिवसेनेची ताकद अगोदरपासून होती. शिवसेना महापालिकेवर १९८५ पासून राज्य करत आहे. भाजपासोबत अनेकदा युती झाली नव्हती. मराठी माणसाचे अस्तित्व, अस्मिता, महाराष्ट्राचा धर्म बुडत आहे. सारेच विकले गेले आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाला, अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत असतो त्याला आव्हान देण्याची गरज आहे. ती महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांचा धर्म दाखवणे आवश्यक आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्याकडे काही शिवसैनिक म्हणतात की, एकटे लढलो असतो तर २० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या. निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे. एकटे लढले की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत