शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:35 IST

Thackeray Group Vaishali Darekar News: देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ यावी. हीच नामुष्की श्रीकांत शिंदेंवर ओढावली आहे, असे सांगत वैशाली दरेकर यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत.

Thackeray Group Vaishali Darekar News:महायुतीबाबत काही जागांवरून अद्यापही चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दहा जागांवर असलेला महायुतीचा तिढा आता दोन-तीन जागांवर आला आहे, असे सांगितले जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून या घोषणेचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सांगली जागेवरून महाविकास आघाडीतील कुरबूर वाढल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. जनतेला बदल हवा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांपैकी कुणीही सांगलीच्या जागेवरून माघार घेताना दिसत नाही. यातच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ठाणे आणि कल्याणमध्ये लढत होणारच नाही. तिथे शिवसेनेचाच उमेदवार जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांचा उमेदवार ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथे विजयी होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. 

श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली. वैशाली दरेकर म्हणाल्या की, मला ऐकून आनंद झाला की, श्रीकांत शिंदे यांना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली. परंतु, माझ्या मनात एक शंका आहे. ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचे चिन्ह काय असेल? कमळ की धनुष्यबाण? कोणत्या चिन्हावर लढायचे हे त्यांनी ठरवले आहे का? याचसाठी सगळा अट्टाहास केला होता का? हीच नामुष्की ओढावली आहे की, त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काही फरक पडणार नाही. काय करायचे, ते आता कार्यकर्ते ठरवतील, असे वैशाली दरेकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी भाजपा खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे मग त्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, हा विश्वास व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी