शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीविरोधात ठाकरे बंधू एकवटले

By admin | Updated: August 28, 2016 19:02 IST

जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होतो आहे.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 28 - जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. मनसेचा जीएसटीला पाठिंबा, मात्र काही शंका आहेत. राज्य आणि मनपाचे अधिकार कायम राहावे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. दहीहंडीसाठी कोर्टानं दिलेले निर्बंधांचं उल्लंघन केलेल्या मनसे कार्यकर्त्यांची आज राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन भेट घेतली आहे. गोविंदांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर याआधी उद्धव ठाकरेंनीही जीएसटीला विरोध केला आहे. 

यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयवर सडकून टीका केली आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, खटल्यांची मला सवय आहे. कोर्टानं मत मांडू नका, न्याय द्यावा असा टोलाही राज ठाकरेंनी कोर्टाला लगावला आहे. मुख्यमंत्री आता गुजरातीमधून टि्वट करत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंवरही पलटवार केला आहे. जेलमध्ये गेल्यावर आयुष्य फळफळत हे नारायण राणेंकडूनच समजलं. नारायण राणेंनी दहीहंडीवर बोलू नये. त्यापेक्षा घरच्यांना थोडे सल्ले द्यावेत, असंही राज ठाकरे म्हणाले आहे. यावेळी नारायण राणेंच्या वृत्तपत्रावरही राज ठाकरेंनी टीका केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

दहीहंडी हा मराठी माणसातील एकी दाखवणारा सण
मुख्यमंत्री गुजरातीमध्ये आता टि्वट करतात
जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न
मत मांडू नका, न्याय द्या- राज ठाकरेंचा कोर्टाला टोला
जेलमध्ये गेल्यावर आयुष्य फळफळत हे नारायण राणेंकडूनच अनेक तरुण शिकले आहेत
राणे सारख्या व्यक्तीने मला सल्ले देण्यापेक्षा स्वतः च्या घरी सल्ला द्यावा, त्याचा फायदा जास्त त्यांना होईल
नारायण राणेंनी दहीहंडीवर बोलू नये
मनुष्यवधाचा गुन्हा दहीहंडीवर कसा लागू शकतो? 
सर्व सणावर कोर्टाने आचारसंहिता आखू नये सरकारने ही नियमावली बनवावी, राज ठाकरे यांची मागणी
राज्य आणि मनपाचे अधिकार कायम राहावे
जीएसटी योग्य मात्र राज्यांना केंद्रशासित करण्याचा डाव
राज ठाकरेंनी केला दहीहंडीत कायदेभंग करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान
मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यायला आलोय, खटल्यांची मला सवय
0मनसेचा जीएसटीला पाठिंबा, मात्र काही शंका आहेत