शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

राष्ट्रपतिपदासाठी मुर्मू यांना ठाकरेंचा पाठिंबा, काँग्रेस म्हणते शिवसेनेची भूमिका 'अनाकलनीय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 05:42 IST

आपण कोणाच्याही दबावात येऊन हा निर्णय घेतलेला नाही, असे ठाकरे यांनी केलं स्पष्ट.

मुंबई : राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात आणि त्यापूर्वीही शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केला. आपण कोणाच्याही दबावात येऊन हा निर्णय घेतलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.  

शिवसेना खासदारांची ठाकरे यांनी सोमवारी बैठक घेतली असता त्या बैठकीत बहुतेक खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची जोरदार मागणी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आता ठाकरे हे मुर्मू यांना पाठिंबा देणार, असे म्हटले जात होते. स्वत: ठाकरे यांनी मंगळवारी तशी घोषणा केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत घेतलेल्या बैठकीला शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह शिवसेनेने धरला होता.

२० जूनच्या रात्री शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे नंतर ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यातच शिवसेनेचे १२ खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याचेही वृत्त आले. खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यास दबाव आणला. राष्ट्रपतिपद हे राजकारणापलीकडचे असते. मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही, असे खा. संजय राऊत म्हणाले.

ठाकरे यांनी दिली पाठिंब्याची कारणे

  • खासदारांचा माझ्यावर दबाव नव्हता. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे खासदारांनी मला सांगितले होते. 
  • तथापि, शिवसेनेतीलच आदिवासी समाजाचे नेते, कार्यकर्ते यांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. 
  • आदिवासी समाजाच्या एका महिलेला देशाचे सर्वोच्च पद मिळते आहे तेव्हा आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असा आग्रह शिवसेनेंतर्गत काम करणारी एकलव्य सेना, आ. आमशा पाडवी, माजी आमदार निर्मला गावित यांनी धरला. 
  • राष्ट्रपती पद हे सर्वोच्च आहे. याआधीही आम्ही प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे शिवसेना कधीही कोत्या मनाने वागलेली नाही, असे ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेची भूमिका अनाकलनीय : काँग्रेसशिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र, या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले अशा परिस्थितीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे; पण मुर्मू यांना पाठिंबा देताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, या शब्दांत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रपती निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूटराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे.

राजकीय वर्तुळात आश्चर्य भाजपसोबत एनडीएमध्ये असताना काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व नंतर प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आज भाजपशी अत्यंत कटू संबंध असतानाही मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022