शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

सैराटची आर्ची झाली दहावी पास

By admin | Updated: June 13, 2017 13:34 IST

सैराट चित्रपटाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकू 66 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली झाली आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 13 - सैराट चित्रपटाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकू 66.40 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली झाली आहे.  नववीच्या परीक्षेत रिंकूला ८१.६० टक्के गुण मिळाले होते. या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. स्वाभाविकच, तिच्या दहावीच्या निकालाबद्दलही प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मीडियावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर, "आर्ची"नं दहावीच्या परीक्षेत "फर्स्ट क्लास" यश मिळवलं आहे.

आर्चीला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50  असे यश तिने मिळवले आहेत. फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करुन रिंकूने परीक्षेत मिळवलेले यश प्रशंसनीय असल्याची भावना तिच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैराटमुळे रिंकू राजगुरु आर्ची या नावाने देशभरात प्रसिद्ध झाली. पण, रिंकु राजगुरे हेसुद्धा तिचे खरे नाव नाहीये. रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. 

दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. 

 

 

१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत.  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत.  90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले. 

राज्य मंडळाने एकूण ५६ विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्यातील २१ हजार ६८४ शाळांमधून १६ लाख ५० हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते