शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे दहा हजार गावे जल संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 07:00 IST

मॉन्सूनचे आगमन लांबल्याने राज्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे

ठळक मुद्देभूजल गेले खोल : लांबलेल्या पावसाने टंचाई होणार तीव्र

पुणे : मॉन्सूनचे आगमन लांबल्याने राज्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार एप्रिल महिन्यातच राज्यातील १० हजार ३६६ गावांतील भूजल पातळी लक्षणीयरित्या खालावली आहे. त्यातील एकवीसशे गावातील भूजल पातळी अत्यंत खालावली आहे. लांबलेल्या पावसाचा या गावांवर अधिक तीव्रतेने परिणाम जाणवेल असे चित्र आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात ३ हजार २६७ लहानमोठे धरण प्रलक्लप आहेत. या धरणांची साठवण क्षमता १ हजार ४४४ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. त्या पैकी मंगळवार अखेरीस ९८ टीएमसी (६.८५ टक्के) पाणी धरणांत शिल्लक आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ८० टक्के लोकसंख्या सिंचन आणि पाण्यासाठी भूजलावर अवलंबून आहे. सातत्याने होत असलेला उपसा आणि सलग दोन वर्षे पर्जन्यमानात झालेली घट यामुळे यंदा बहुतांश भागातील भूजल पातळी खालावली आहे. भूजल विभागाने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील १० हजार ३६६ गावांतील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यातील ५ हजार ६४० गावांमधे भूजल पातळी सरासरीपेक्षा १ ते २ मीटरने खालावली आहे. तर २ हजार ५५६ गावांतील पाणी पातळीत २ ते तीन आणि २ हजार १७० गावांत तब्बल ३ मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेली आहे. राज्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसलेल्या मराठवाड्यातील तब्बल ४ हजार ६८१ गावांतील पाणीपातळी खाली गेली आहे. त्यातील १३८० गावांमधे सरासरीपेक्षी तीन मीटरहून अधिक पाणी खोल गेले आहे. तर, २ हजार ७१ गावांतील पाणी पातळीत १ ते २ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे. केरळात पावसाचे आगमन लांबल्याने राज्यात सर्वत्र पाऊस व्यापण्यास आणखी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आधीच पाणी खोल गेलेल्या गावांत टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -------------------------पाणी पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या 

जिल्हा        ३ मीटरपेक्षा अधिक        २-३ मीटर    १-२ मीटरजळगाव        १८२            १६२        ३०२अहमदनगर        ९५            १५६        २६०पुणे            ४३            १२४        १९२सोलापूर        ९२            १८२        ३०९औरंगाबाद        १९४            ३१०        ४७१बीड            ३१६            २३५        ३९२जालना        २१६            २०८        ३०४उस्मानाबाद        २९०            १४४        ११२लातूर            १९९            ११९        २३४अमरावती        ६७            १८५        ४६७    बुलडाणा        २०            ३८        ५११वर्धा            १            ६४        ३५९

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळWaterपाणीMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामान