शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

दोन कोटी जनतेच्या हाती दहा खासदारांचे भवितव्य    

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 06:00 IST

जसे जसे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली तशी , दादा, साहेब , भैय्या, अशा सर्वांनी मतदारसंघात मोर्चा बांधणी आणि आपला डंका वाजवण्यास सुरुवात केली.. पण..

ठळक मुद्देपुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या दहा जागा केवळ वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरव्याच्या आधारावर मतदारयादीत नाव नोंदविता येणार दिव्यांग मतदारांची संख्या पोहोचली ६१ हजारांवर१० हजार ५०४ मतदान स्थळांवर २० हजार ७३६ मतदानकेंद्रावर मतदानाची सुविधा उभारण्यात येणारपुणे विभागात निवडणुकीसाठी १.३७ लाख कर्मचाऱ्यांचे लागणार बळ 

पुणे : पुणे विभागातील लोकसभा मतदार संघाच्या दहा जागांसाठी १ कोटी ९३ लाख ९६ हजार ७५५ मतदार मतदान करतील. त्यासाठी १ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांचे बळ लागेल. आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, नागरिकांना अजूनही मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावी, नसल्यास नाव नोंदवावे असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसेकर यांनी पुणे विभागातील दहा लोकसभा मतदरासंघांतील निवडणुकीच्या कामांची माहिती दिली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत. या जिल्ह्यातील एकूण मतदार १ कोटी ८६ लाख १८ हजार ५४६ इतके आहेत. मात्र, मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण हे विधानसभा मतदार संघ येतात. तर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा मतदारसंघ उस्मानाबादला जोडलेला आहे. त्यामुळे विभागातील दहा मतदारसंघातील मतदारांची संख्या १ कोटी ९३ लाख ९६ हजार ७५५ इतकी होते. या मतदारांसाठी १० हजार ५०४ मतदान स्थळांवर २० हजार ७३६ मतदानकेंद्रावर मतदानाची सुविधा उभारण्यात येणार आहे. म्हैसेकर म्हणाले, कोणताही मतदार मतदान प्रक्रियेच्या बाहेर राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. केवळ वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरव्याच्या आधारावर मतदारयादीत नाव नोंदविता येणार आहे. विशेषत: १८ ते १९ वयोगटातील युवकांची नोंदणी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. परगावी असलेल्या विद्याथ्यार्ला आपल्या मतदारसंघाच्या यादीतही मतदार नोंदणी अर्ज भरुन नाव नोंदविता येईल. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. असे अर्ज संबंधित मतदारसंघात हस्तांतरीत करण्यात येतील. -----------------------

जिल्हानिहाय मतदारसंख्या लोकसभा आणि विधानसभांच्या जागाजिल्हा     मतदारसंख्या        लोकसभा जागा        विधानसभा जागा        पुणे           ७३,६३,८१२        ४            २१सातारा     २४,८४,०३९        १            ८सांगली       २३,५०,३५९        १            ८सोलापूर    ३३,४४,५८५        २            ११कोल्हापूर    ३०,७५,७५१        २            १०------------------------------

मतदारसंघ निहाय मतदारांची संख्यामतदारसंघ        पुरुष        महिला        एकूणमावळ              ११,६५,७९०    १०,६१,३१०    २२,२७,१३३पुणे               १०,४१,७४५    ९,८२,९३०    २०,२४,७३१बारामती        १०,९१,६३२    ९,८५,६२५    २०,७७,२७८शिरुर             ११,१२,३६८    ९,९९,०६६    २१,११,४६५सोलापूर        ९,४८,५०८    ८,७१,७१०    १८,२०,२५९म्हाडा            ९,९०,३०४    ८,९५,९९७    १८,८६,३१३सांगली            ९,२४,६२८    ८,६७,४४१    १७,९२,१३१सातारा             ९,२८,६२०    ८,९४,८४०    १८,२३,४७६कोल्हापूर        ९,५४,७८८    ९,१३,४३३    १८,६८,२३५हातकणंगले    ९,१२,०७७    ८,५३,५९६    १७,६५,७३४एकूण        १,००,७०,४६०    ९३,२५,९४८    १,९३,९६,७५५----------------------------

जिल्हानिहाय मतदानकेंद्र आणि स्थळांची संख्या

जिल्हा        मतदानकेंद्र        स्थळेपुणे            ७,६६६            २,९७६सातारा        २,९७०            २,१२९सांगली        २,४०५            १,४२०सोलापूर        ३,४८०            १,९११कोल्हापूर        ३,३२१            १,८४२------------------

दिव्यांग मतदारांची संख्या पोहोचली ६१ हजारांवरपुण्यामध्ये १२,७८२, सातारा १० हजार, सांगली १६,६३३, सोलापूर ८ हजार ४०० आणि कोल्हापूरात १४ हजार १४५ दिव्यांग मतदार आहेत. कर्णबधिरत्व असलेले दिव्यांग व्यक्ती सहज लक्षात येत नाहीत. या प्रक्रियाते कर्णबधिर व्यक्ती सुटू नयेत याची खबरदारी घेण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना