शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

तापमानात वाढ; मुंबईला पावसाचा इशारा

By admin | Updated: October 25, 2015 02:28 IST

आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू होत असतानाच येथे होणाऱ्या वातावरणीय बदलाने मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत

मुंबई : आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू होत असतानाच येथे होणाऱ्या वातावरणीय बदलाने मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, दिवसासह रात्रीही जाणवणारा उकाडा मुंबईकरांना असह्य झाला आहे. त्यात आता पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसराला हवामान खात्याने हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या उष्णतेसह उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. १५ आॅक्टोबरपासून मुंबई शहराचे कमाल तापमान सलग ३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे; शिवाय किमान तापमानही २४-२६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. परिणामी, मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ३६ अंशावर चढलेले कमाल तापमान खाली उतरत नसल्याने मुंबईकरांना भरदिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. त्यात वातावरणीय बदलामुळे पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशावर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. र(प्रतिनिधी)मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या उष्णतेसह उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. १५ आॅक्टोबरपासून मुंबई शहराचे कमाल तापमान सलग ३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे; शिवाय किमान तापमानही २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.