तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात शोधल्या खेकड्याच्या पाच प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:25 AM2021-10-20T09:25:32+5:302021-10-20T09:25:32+5:30

नव्या प्रजातींचा शोध लावण्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांना यश आले आहे. तेजस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

Tejas Thackeray discovered five species of crab in the Western Ghats | तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात शोधल्या खेकड्याच्या पाच प्रजाती

तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात शोधल्या खेकड्याच्या पाच प्रजाती

googlenewsNext

- संदीप आडनाईक

कोल्हापूर : ‘घाटियाना’ कुळातील दोन आणि तीन प्रजाती या ‘सह्याद्रीना’ कुळातील अशा खेकड्यांच्या एकूण पाच नव्या प्रजातींचा शोध लागला असून या पाचही प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळल्या आहेत. या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांना यश आले आहे. तेजस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

साताऱ्याजवळील कोयना परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये यापैकी ‘घाटियाना ड्यूरेली’ च्या चार प्रजाती आढळल्या. तर ‘घाटियाना रौक्सी’ ही प्रजात गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये सापडली. सह्याद्रीमध्ये आढळणारी प्रजात ही प्रदेशनिष्ठ असून एक प्रजात गोवा तसेच कर्नाटकातील परिसरात आढळली.

‘झूलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ चे संशोधक एस. के. पाटी तसेच ‘ठाकरे वाइल्ड फाउंडेशन’ चे संस्थापक तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या या संशोधनाची माहिती फ्रान्सच्या ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ ने प्रकाशित केलेल्या ‘झूसिस्टेमा’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ ‘सह्याद्रीना’ कुळातील खेकड्यांच्या प्रजातींची संख्या १० होती. मात्र, या शोधामुळे या कुळातील या प्रजातींची संख्या १३ झाली आहे. ‘आतापर्यंत या कुळातील आठ प्रजाती माहिती होत्या.

पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. खेकड्यांच्या या नव्या प्रजातींमुळे गोड्या पाण्यातील जैवविविधतेवर प्रकाश पडला आहे. नामशेष होणाऱ्या प्रजातींसाठी संवर्धनाचे काम करणारे संशोधक जेराल्ड मालकॉम ड्यूरेल यांचे नावे ‘घाटियाना ड्यूरेली’ या खेकड्यांच्या प्रजातीला देण्यात आले आहे.
- तेजस ठाकरे, संस्थापक, ठाकरे वाइल्ड फाउंडेशन

या आहेत पाच प्रजाती...
‘घाटियाना’ कुळातील नव्या प्रजातींचे नामकरण ‘घाटियाना रौक्सी’ आणि ‘घाटियाना ड्यूरेली’  असे करण्यात आले आहे. 
‘घाटियाना’ कुळातील खेकड्यांची प्रजात निशाचर असून ती झाडांच्या खोडांमधील छिद्रांमध्ये राहते. 
‘सह्याद्रीना’ कुळातील ‘सह्याद्रीना इनोपिनाटा’ ही प्रजात महाबळेश्वरमधील धोबी धबधब्यातून, ‘सह्याद्रीना केशरी’ प्रजात नाशिकच्या ब्रह्मगिरी येथून तर ‘सह्याद्रीना ताम्हिणी’ प्रजात ताम्हिणी घाटामधून शोधण्यात आली आहे.

Web Title: Tejas Thackeray discovered five species of crab in the Western Ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.