शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बारावी माहिती तंत्रज्ञानाच्या पेपरला तांत्रिक अडचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 19:41 IST

बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन परीक्षा सकाळी ११ ते १.३० या वेळेत ठेवण्यात आली होती.

ठळक मुद्देकाही केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलली : विद्यार्थ्यांना फटकासर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उद्भवली त्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ व २० मार्च रोजी घेतली जाणार बारावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याने पालकांकडून तीव्र नाराजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाद्वारे (राज्य मंडळ) घेण्यात येत असलेल्या बारावी माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये लिंक ओपन न झाल्याने काही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उद्भवली असून त्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ व २० मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पुणे व मुंबई शहरातील काही केंद्रांवर सर्व्हरच्या बिघाडाचा फटका बसला, मात्र, राज्यात इतर केंद्रांवर माहिती तंत्रज्ञान विषयाची ही परीक्षा सुरळीत पार पडली, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी सांगितले. बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन परीक्षा सकाळी ११ ते १.३० या वेळेत ठेवण्यात आली होती. बीएमसीसी येथील परीक्षा केंद्रावर सकाळी अकरा वाजता विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले. मात्र विद्यार्थ्यांचे लॉग इन होऊन लिंकच ओपन होत नव्हती. विद्यार्थ्यांनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाट पाहिली. मात्र अखेर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर होऊ शकणार नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. बारावीचा आज शेवटचा पेपर होता. त्यामुळे आज संध्याकाळीच बाहेरगावी जाण्याचे नियोजन अनेक विद्यार्थी व पालकांकडून करण्यात आले होते. मात्र आज अचानक पेपर न होऊ शकल्यामुळे त्यांना त्यांचे सर्व नियोजन रदद् करावे लागले आहे. बारावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याने पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. .................ऑनलाइन असल्याने पेपर फुटण्याची भीती नाहीमाहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा काही विद्यार्थ्यांना देता आली नसली तरी ही परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे पेपर फुटण्याची भीती नाही. या परीक्षेमध्ये प्रत्येक विद्याथ्यार्ला स्वतंत्र पेपर दिलेला असतो. शहरातील ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांना हा पेपर देता आला नाही, त्यांची परिक्षा सोमवारी (दि. १८ मार्च ) आणि बुधवारी (दि. २० मार्च ) रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीonlineऑनलाइन