शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आता चहा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 23:17 IST

गेल्या आठवड्यात  मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला आहे.

मुंबई  -  गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी कोणत्या प्रकारची चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, त्यात असे काय टाकले जाते ? तेच कळत नाही. आजच्या काळात आपण ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकलेले आहेत.मुख्यमंत्री कदाचित नवीन प्रकारची सोन्याची चहा पित असतील किंवा पाजत असतील हाच मोठा प्रश्न आहे ?. माहितीच्या अधिकाराच्या पत्रकात असे दिसून येत आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहा-पाण्यावर होणाऱ्या खर्चामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. २०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ५८ लाख रुपये चहावर खर्च झाले. तर २०१७-१८ मध्ये हा खर्च वाढून ३.४ कोटी इतका झाला. चहा-पाण्याच्या खर्चामध्ये ५७७% इतकी प्रचंड वाढ झाली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज १८,५०० कप चहा प्यायली जाते. हे अगदी कोणालाही न पटण्यासारखे आहे. एकीकडे रोज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे चहावर होणा-या खर्चातही ५७७% इतकी वाढ केली जाते. हा एक खूप मोठा घोटाळा आहे. भाजपा सरकार हे घोटाळ्याचे सरकार आहे. संजय निरुपम पुढे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते स्वतः एकेकाळी चहा विकायचे असे मोठ्या अभिमानाने सांगतात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा हा वारसा इतका पुढे घेऊन जातात की तो चहा सर्वसामान्य चहाच्या टपरीवर विकता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चहाच्या नावावर देश लुटायला बसलेले आहेत. गेल्याच आठवड्यात उंदीर मारण्याच्या आकडेवारी वरून विरोधकांसमोर सरकारचे नाक कापले गेले आणि आता हा नवीन घोटाळा समोर आला आहे. घोटाळा मग तो उंदीर घोटाळा असो किंवा चहा घोटाळा असो, मला एकच सांगायचे आहे. यामध्ये सर्वसामान्य करदात्या नागरिकांची लूट होत आहे. सर्वसामान्यांचा पैसे लुटला जात आहे आणि यासाठी या देशाची आणि महाराष्ट्राची जनता भाजप सरकारला कधीच माफ करणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Nirupamसंजय निरुपम