चहावाला सोमनाथ गिरामला भीषण अपघात, रुग्णालयात दाखल

By admin | Published: September 9, 2016 11:49 AM2016-09-09T11:49:29+5:302016-09-09T12:43:59+5:30

चहाची टपरी चालवून सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेला व राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या ' कमवा व शिका ' योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनलेला सोमनाथ गिरम याला अपघात झाला आहे.

Tea drink Somnath Giram, admitted to a hospital in a critical accident | चहावाला सोमनाथ गिरामला भीषण अपघात, रुग्णालयात दाखल

चहावाला सोमनाथ गिरामला भीषण अपघात, रुग्णालयात दाखल

Next

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ - चहाची टपरी चालवून सी.ए. ची ( चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षा उत्तीर्ण झालेला व राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या ' कमवा व शिका ' योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनलेला सोमनाथ गिरम याला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या कमरेखालील भागाची हालचाल होत नाही. त्याच्यावर सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमनाथला सोलापूर येथे हा अपघात झाल्याचे समजते. गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास तो कामानिमित्त घराबाहेर गेला होता,  काम पूर्ण करून घरी परतत असताना त्याच्या गाडीसमोर कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्याच्या खाली उतरली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला झटका बसला, असे त्याच्या मित्राने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
 
(चहावाला सोमनाथ बनला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!)
  •  
 
चहाची टपरी चालवून चार्टड अकाउटंट (सी. ए.) ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची नुकतीच राज्य शासनाच्या कमवा व शिका योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली होती. त्यामुळे आजवर स्वत:च्या कमाईवर शिक्षण पूर्ण करणारा सोमनाथ आता इतर विद्यार्थ्यांनाही धडे सज्ज झाला.  सोमनाथ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देईल. त्यामुळे त्याला शासनाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर केले जात आहे. डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस - रुबिका सारख्या संस्थांमुळे पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडली आहे, असे तावडे म्हणाले होते. 
 
कसा बनला सोमनाथ सी.ए?
सोमनाथ हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सांगवी गावचा. गावी जिरायती शेती होती. पाऊसच पडत नसल्याने पिकही नाही. त्यामुळे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत घरचा गाडा चालवतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे अशक्य असल्याने सोमनाथने दररोज ३२ किमी अंतर सायकलवर कापत जेऊर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
उच्चपदवीच्या शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर घरातून पैसे येणे शक्य नव्हते. म्हणून सोमनाथने पेरूगेट पोलीस चौकीच्या परिसरात चहाची टपरी टाकली. त्याच काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. एक चहा विक्रेता पंतप्रधान बनू शकतो तर आपण का नाही... या विचाराने प्रेरित होऊन दिवसभर चहा विकून आणि रात्रभर अभ्यास करून सोमनाथने सीएची अंतिम परीक्षा दिली आणि त्यात तो उत्तीर्ण झाला

 

Web Title: Tea drink Somnath Giram, admitted to a hospital in a critical accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.