शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परप्रांतातील दुधावर कर लावा आणि भेसळ, कृत्रिम दुधाला रोखा - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 7:13 PM

शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. 

नागपूर : शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. यावेळी नीलम गो-हे म्हणाल्या, १९६५ ला प्रतिदिन १ लाख लीटरची उलाढाल होती, आता ती २१ कोटी लीटरवर पोहोचली आहे. दूध उत्पादन कल्याणकारी संघ, अहमदनगर - वडगाव आमली ता पारनेर जि नगर यांचे वतीने गुलाबराव डेरे यांनी मला निवेदन दिले आहे, त्यातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्नावर प्रकाश पडतो आहे.४० टक्के वाटा सहकार पक्षाचा, ६० टक्के खाजगी क्षेत्राचा वाटा आहे. दुधाचे ब्रँड कमी करून एक ब्रँड शासन, सहकाराचा व दुसरा खाजगी ब्रँड ठेवावा जेणेकरुन ग्राहकांची व शेतकऱ्यांची लूट थांबेल. गावोगावची दुधसंकलन केंद्रे बंद पडली आहेत. गावागावात खाजगी संख्या दुधाचा दर्जा सांभाळतातच असे नाही त्याचसोबत दुधभेसळ प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत. तसेच, परराज्यातील दुधावर कर लावण्यात यावा. त्याचवेळी टोन्ड दूध बंद करून गायीचे दूध हा खास ब्रँड प्रोत्साहित करावा, असेही नीलम गो-हे यांनी सांगितले. शेतकरी कष्ट करतात पण त्यांच्या घरातील महिला शक्ती अहोरात्र राबत असते. आज त्यांच्या कष्टाचे किमान वेतन मोजले तर दुधाच्या उत्पादनाचा खर्च कितीतरी पटीने अधिक गृहीत धरावा लागेल. स्त्रियांच्या कष्टाचे मोल मोजून ही प्रतिलीटर ५ रु थेट मदत तुटपुंजी आहे. सरकारने दुधसंघांना सक्षम करायचा प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना सक्षम होतील असे धोरण राबवावे, असेही यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेMilk Supplyदूध पुरवठाnagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८