समीक्षेद्वारे अभिरुची डोळस बनवायचीय : रेखा इनामदार-साने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 02:27 PM2019-11-15T14:27:24+5:302019-11-15T14:29:16+5:30

कोणत्याही काळात गंभीर विचार करणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या कमीच असते आणि राहील...

The tastes of the eyes should be made by critique | समीक्षेद्वारे अभिरुची डोळस बनवायचीय : रेखा इनामदार-साने

समीक्षेद्वारे अभिरुची डोळस बनवायचीय : रेखा इनामदार-साने

Next
ठळक मुद्देसमीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी संवाद

प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : कोणत्याही काळात गंभीर विचार करणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या कमीच असते आणि राहील. परंतु, सगळेच हरपत चालले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. ज्यांना आपला दृष्टिकोन अधिक सहिष्णू करायचा आहे, अभिरुची डोळस बनवायची आहे असे वाटते ते समीक्षेकडे नक्कीच गांभीर्याने पाहतात. विशेषत:, निमशहरी भागातील तरुण मुले वाचत आहेत, त्यांना व्यक्त व्हावेसे वाटत आहे. त्यामुळे अजून अंधार दाटलेला नाही, असा आशावाद ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. धुळे येथे होणार असलेल्या समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे औैचित्य साधून रेखा इनामदार-साने यांनी ‘ल्
समीक्षा संमेलनाची गरज कशी अधोरेखित कराल?
- गेल्या आठ वर्षांपासून हे संमेलन यशस्वीपणे आयोजित केले जात आहे. संमेलनाच्या निमित्ताने जुने-नवे, जाणते-अजाणते समीक्षक एकत्र येऊन साहित्याविषयीच्या विचारांचे आदान-प्रदान करतात. साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने विचारमंथन महत्त्वाचे असते. त्यामुळे समीक्षा संमेलनाची गरज अधोरेखित होते.

* वाचकांमध्ये समीक्षेविषयी फारशी आपुलकी पाहायला न मिळण्याचे कारण काय?
-  सर्वसामान्य समाजामध्ये समीक्षेविषयी अनास्था पाहायला मिळते. वाचनसंस्कृतीमध्ये त्यांना बौैद्धिक खटाटोप करावासा वाटत नाही. चिकित्सा सौैंदर्याला मारक असते, असा समज सर्वत्र पाहायला मिळतो. त्यामुळे समाजाची समीक्षा वाङ्मयीन समज फार प्रगल्भ आहे, असे वाटत नाही. अभिरुचीसंपन्न होण्याची गरजही वाचकांना वाटत नसेल तर समीक्षा व्यवहाराविषयी आपुलकी कशी वाटणार? ब्लॉग, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून पुस्तक, गाणे, प्रदर्शनाविषयी अनेक प्रतिक्रिया व्यक्त होतात. एखादी कलाकृती का आवडली किंवा का आवडली नाही, याविषयी मतमतांतरे पाहायला मिळतात. याचा अर्थ प्रत्येकाला अभिव्यक्ती महत्त्वाची वाटते. अभिव्यक्तीचे नीट स्वरूप म्हणजेच समीक्षा आहे, हे समजून घ्यायला हवे.
* समीक्षा किचकट आणि क्लिष्ट वाटते. समीक्षेचे मापदंड बदलले पाहिजेत, असे वाटते का?
- साहित्य सोपे, सहजसुलभ असावे असा दुराग्रह, हट्टाग्रह कशासाठी? वैैद्यकीय, अभियांत्रिकी शाखेचे ज्ञान सोपे असले पाहिजे, असे आपण म्हणत नाही. क्लिष्ट विषयामध्ये किमान प्रावीण्य संपादन करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. लांबलचक वाक्यांचा गुंता, पारिभाषिक संज्ञांचे जंजाळ नको हे बरोबर असले तरी सगळेच सोपे करणे शक्य नाही. चित्रकाराला आपण सोपे चित्र काढ, असे सांगतो का? त्याचप्रमाणे समीक्षेच्या स्वत:च्या काही चौैकटी आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपण आळशी न होता आपली समज वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
* महिला समीक्षकांची संख्या तुलनेने कमी असण्याचे कारण काय?
- एकूणच साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रातच महिलांची संख्या कमी आहे. समीक्षा हा बौैद्धिक खटाटोप आहे. त्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो, परिश्रम घ्यावे लागतात, सिध्द्धांत निर्माण करावे लागतात. धडपडीत गुंतलेल्या महिलांना तेवढी उसंत, शांतता आपल्याकडे मिळतच नाही. तरीही सत्तर ते नव्वदच्या दशकात सरोजिनी वैैद्य, पुष्पा भावे, सुधा जोशी, विजया राजाध्यक्ष या चौैघी पायरोवून उभ्या राहिल्या. बाह्यपरिस्थितीच्या रेट्यातून बाहेर पडून नव्या पिढीतूनही नवे समीक्षक निपजतील, याची खात्री वाटते. 
....

Web Title: The tastes of the eyes should be made by critique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.