शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

CoronaVirus : टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधणार, मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:16 IST

CoronaVirus : उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.  

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. यातच कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. 

उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.  

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार असून हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc उद्या रविवार १६ तारखेस दुपारी १२ वाजता पहावयास मिळेल.  

याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

देशात लवकरच आणखी पाच लसी; नीती आयोगाची माहितीदेशामध्ये आणखी काही महिन्यांनंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक या लसींव्यतिरिक्त आणखी ५ कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत. १. बायो ई सबयुनिट वॅक्सिन, २. झायडस कॅडिला डीएनए, ३. एसआयआय-नोवावॅक्स, ४. बीबी नेझल वॅक्सिन आणि ५. जिनोव्हा एमआरएनए या लसी आहेत.

मुंबईत कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक,टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदतमुंबईत मागील ११ दिवसांपासून कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडून याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ मे ते ११ दरम्यान मुंबईत ७८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, म्हणजेच मृत्युदर हा २.५० टक्के आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन मृत्युदरही एक टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आला आहे. परिणामी, मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र