शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव बिनविरोध, वांद्रे पूर्वमध्ये लढत अटळ

By admin | Updated: March 13, 2015 01:36 IST

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पाटील यांच्या पत्नी सुमन

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पाटील यांच्या पत्नी सुमन यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. भाजपाने या मतदारसंघात उमेदवार द्यायचा किंवा कसे याबाबत अद्याप निर्णय घेतला नसला तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. नारायण राणे अथवा कृपाशंकर सिंह ही निवडणूक लढवणार आहेत.विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांना भाजपाने लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदी यांनी पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयाप्रति सर्वांनाच सहानुभूती असल्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुमन यांनाच उमेदवारी देऊ केली तर त्यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार असणार नाही, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार प्रीतम मुंडे यांची लोकसभेवर बिनविरोध निवड झाली. आता भाजपाने मोठे मन दाखवून पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. आर. आर. पाटील यांचे राजकीय विरोधक संजयकाका पाटील हे भाजपात असून, या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा किंवा कसे याबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या मतदारसंघात त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची किंवा कसे यावर शिवसेनेत चर्चा सुरू आहे. विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांचे नाव चर्चेत असून, याची धुरा त्यांच्याच खांद्यावर द्यायची असल्याने ते उमेदवारी स्वीकारण्यास उत्सुक नाहीत.