शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
5
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
6
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
7
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
8
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
9
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
10
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
11
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
12
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
13
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
14
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
15
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:19 IST

मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे असं सांगत शिंदेंनी वादग्रस्त नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.

मुंबई - मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेच्या नेत्यांमुळे पक्ष अडचणीत आल्याचे चित्र दिसून आले. आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला केलेली मारहाण, मंत्री संजय संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओ यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोलले जाते. बातम्यांमध्ये सातत्याने शिंदेसेनेच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि कृत्य झळकत असल्याने पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नेते, पदाधिकारी यांना कानपिचक्या दिल्या. 

सोमवारी दादर येथे एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की, मागील काळात ज्या घटना घडल्या त्यामुळे लोक तुमच्यावर नाही तर माझ्यावर प्रश्न उभे करतात. मला विचारले जाते, तुमचे आमदार काय करतायेत? काही मंत्र्‍यांना बदनामीमुळे घरी जावे लागले. मला तुमच्यावर कारवाई करायला आवडत नाही परंतु जर कुणी तशी वेळ आणली तर मी करेन असा इशारा त्यांनी वादग्रस्त नेत्यांना दिला.

तसेच कमी बोला, जास्त काम करा. चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्ची घालू नका. आपण एकाच कुटुंबातील आहोत. तुमची बदनामी ती माझी बदनामी आहे. मी प्रमुखासारखं वागत नाही, मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे. आपल्याला खूप कमी कालावधीत मोठे यश मिळाले आहे. काही जण आपली प्रतिमा मलिन करण्याचा कट रचत आहेत. येणाऱ्या काळात आपली परीक्षा असेल. सामाजिक जीवनात वावरताना काळजी  असंही एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना सांगितले. 

एकनाथ शिंदे नाराज का?

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदेसेनेच्या २ नेत्यांनी केलेल्या वर्तवणुकीमुळे सरकार अडचणीत आले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणासाठी जबाबदार धरत आमदार निवासस्थानातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्याशिवाय सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत एका पलंगावर बसून शिरसाट सिगारेट ओढत होते आणि शेजारी पैशांनी भरलेली बॅग होती असा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिरसाट अडचणीत सापडले. या सर्व प्रकारावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे पुढे आले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Gaikwadसंजय गायकवाड