शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

घर घेताय? फसवणूक टाळा; प्राधिकरणांची वेबसाइट जोडणार महारेराला, प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 2:00 PM

  महारेराच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची घर घेताना होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

मुंबई : अनधिकृत बांधकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नियोजन प्राधिकरणांच्या नागरी क्षेत्रात विकास प्रस्तावांअर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींची यादी, सविस्तर विकास प्रस्ताव, मंजुरी, सर्व्हे नंबर, विकासकाच्या नावासह सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळण्यासाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असतानाच ही संकेतस्थळे महारेराच्या संकेतस्थळाशी जोडण्यावरही भर देण्यात आला आहे. 

  महारेराच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची घर घेताना होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

प्राधिकरणांनी काय करावे?-    अनधिकृत बांधकामांची यादी प्रसिद्ध करून नागरिकांना जाहीर आवाहन करावे.-    होर्डिंग्जच्या माध्यमातून नागरिकांना अनधिकृत इमारतीत घर घेऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश आहेत.

बिल्डर काय  करतात-    बिल्डर हे प्राधिकरणाच्या समन्वयाच्या अभावाचा फायदा घेतात.-    बनावट बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या आधारे महारेराकडे नोंदणी करतात.-    अनधिकृत घर बांधणी प्रकल्प उभारला जातो.

माहिती अपडेट करामहापालिकांनी तसेच नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या क्षेत्रातील रहिवासी, वाणिज्य वापरासाठीच्या प्रकल्पांना जारी करत असलेले प्रारंभ प्रमाणपत्रे व भोगवटा प्रमाणपत्रे ही त्यांच्या संकेतस्थळावर जनतेसाठी प्रसिद्ध करावीत. माहिती वेळोवेळी अपडेट करावी.

घर घेताना हे चेक करा --    प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का? -    महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे का?-    घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे का?-    तुम्ही १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय का?-    मुंबई महापालिका जेव्हा बिल्डरला परवानगी देते तेव्हा त्या परवानग्या संकेतस्थळावर टाकल्या जातात. त्यामुळे हे सगळे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असते. रेरादेखील यामुळे सहज या गोष्टी तपासू शकते.- नोंदणीसाठी येणा-यांनी सेल्फ सर्टिफिकेशन द्यायचे असते. यामध्ये सीसी आणि लोकल गव्हर्मेंटची परवानगी याचा समावेश असतो. -    ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत का? 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017