शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Exclusive: 'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंना संजय राऊतांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 2:54 PM

अजित पवारांना संजय राऊतांकडून आगळावेगळा सल्ला

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर सातत्यानं भाजपाला लक्ष्य करणारे आणि शिवसेनेची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांची आज लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निकालाआधीच ठरलेलं सत्ता स्थापनेचं प्लानिंग, पत्रकारितेतलं दिवस, उदयनराजेंची शिवसेनेवरील टीका, भाजपाकडून वारंवार उपस्थित केला जाणारा हिंदुत्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचं नातं यासह अनेक मुद्द्यांवर दिलखुलास भाष्य केलं. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. या मुलाखतीच्या शेवटी राऊत यांना काही नेत्यांची नावं विचारण्यात आली. या नेत्यांचं वर्णन कसा कराल आणि त्यांना काय सल्ला द्याल, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास सल्ला दिला. संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांचं केलेलं वर्णन आणि त्यांना दिलेले सल्ले

उद्धव ठाकरे- निष्कपट व्यक्तिमत्त्व. आता आपण मुख्यमंत्री आहात. त्यामुळे कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. 

अॅड. प्रकाश आंबेडकर- भाजपाला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये.

असदुद्दीन ओवेसी- उत्तम कायदेपंडित. स्वत:ची भूमिका पटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण त्यांनी व्होट कटिंग मशीनची प्रतिमा बदलायली हवी.

अजित पवार- सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री. कामाला वाघ आहेत. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आहे. हिंमतीने काम करणारा माणूस. तोंड खराब आहे. ते त्यांनी तसंच ठेवावं. 

राज ठाकरे- कलावंत माणूस. उत्तम व्यंगचित्रकार. राज ठाकरे नेतेसुद्धा आहे. पण त्यांच्यातली व्यंगचित्रकला संपत चाललीय. राज ठाकरेंनी अधूनमधून ब्रश घेऊन फटकारे मारले पाहिजेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaj Thackerayराज ठाकरे