ऊसतोडणी दरवाढीचा निर्णय लगेच घ्या
By Admin | Updated: October 31, 2014 01:52 IST2014-10-31T01:52:22+5:302014-10-31T01:52:22+5:30
राज्यातील ऊसतोडणी मजुरांची दरवाढीची मागणी योग्य आहे, अशी संघटनेची भूमिका असून, त्याबाबत निर्णय झाल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरळीत होणार नाही.
ऊसतोडणी दरवाढीचा निर्णय लगेच घ्या
राजू शेट्टी यांची मागणी : शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजुरांची दरवाढीची मागणी योग्य आहे, अशी संघटनेची भूमिका असून, त्याबाबत निर्णय झाल्याशिवाय यंदाचा हंगाम सुरळीत होणार नाही. हे ध्यानी घेऊन शपथविधीनंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिली.
जयसिंगपूरला येत्या शनिवारी संघटनेची 13वी ऊस परिषद होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर संघटनेची भूमिका, यंदाचे ऊस आंदोलन व विधानसभा निवडणुकीतील संघटनेचे अपयश याबद्दल शेट्टी यांनी म्हणणो मांडले. ते म्हणाले, राज्यात 9 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. आता ऊसतोडणीचा टनाचा बेसिक दर 19क् रुपये आहे. तो वाढवून 35क् रुपये करावा व त्यावर कमिशन द्यावे, अशी त्यांच्या संघटनेची मागणी आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी साखर संघाच्या पदाधिका:यांना बरोबर घेऊन तातडीने चर्चा करायला हवी. यातून तोडगा निघाल्याशिवाय हंगाम सुरू होणार नाही. शेतक:यांना चार पैसे कमी मिळाले तरी चालतील; परंतु मजुरांनाही त्यांच्या हक्काचे चार पैसे मिळाले पाहिजेत, असे संघटनेला वाटते. यासाठी तातडीने नवनियुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लवकरच पंतप्रधानांनाही भेटणार
महाराष्ट्रातील साखर उद्योगाकडे केंद्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच केली आहे. केंद्र सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, यासंबंधीचा प्रस्ताव साखर कारखानदारांनी द्यावा, त्यानुसार केंद्र आपले धोरण निश्चित करील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. त्यानुसार येत्या आठवडय़ाभरात असा प्रस्ताव तयार करून त्यांची भेट घेणार आहे.