शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात चक्क वाघाने पळवलं मजुराचं टोपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 5:18 PM

वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे.

- राजकुमार चुनारकरचिमूर : वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास नवेगाव गेटच्या परिसरात रोडचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्यासाठी फायबरचे टोपले ठेवले होते. अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार होतानाचा क्षण गाईडने आपल्या कॅमेऱ्यात टिपला. जंगलाच्या राजाची या महिन्यातील ही दुसरी लीला आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताडोबाची जगात ओळख निर्माण झाली आहे.ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याने वाघाच्या वावरासाठी जंगल कमी पडू लागल्याचे वन्यजीव प्रेमींकडून ओरड केली जात आहे, वाघ जास्त असल्याने कुठल्या ना कुठल्या स्थळी वाघ पर्यटकांना दिसत आहे. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरू आहे, या कामावर गिट्टी मुरूम पसरवण्यासाठी मजूर काम करीत आहेत.शनिवार ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास नवेगाव गेटपासून काही अंतरावर मजूर काम करीत असताना त्यांचे प्लॅस्टिकचे टोपले तोंडात घेऊन जंगलाचा राजा पसार झाल्याचा क्षण काही पर्यटक व गाईडने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. असाच काहीसा प्रकार मोहली परिसरातील मजुरांचे जेवनाचे टिफीन तोंडात घेवून वाघोबा पसार आला होता . आता अचानक ही घटना घ२ल्याने मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र या घटनेपासून पर्यटकांना चांगलाच आनंद मिळाला आहे. जंगलाच्या राजाच्या या लीला पर्यटकांना चांगल्याच भावत आहेत.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प