शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर ; ‘मी टू’ च्या वादळाचे सावट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 20:42 IST

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देअनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार शनिवारी दिवसभर विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिध्दार्थ यांची चौकशी सुरूचौकशी समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त

पुणे : सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. जवळपास शंभरहून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक अनुपम सिध्दार्थ यांना पदावरून हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून संस्थेतील जवळपास दहा विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिध्दार्थ यांच्याविषयी ईमेलद्वारे तक्रार केली आहे. त्यामध्ये २०११ पासूनच्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थिनींनी त्यात प्रसंगही नमुद केले आहेत. तसेच सिद्धार्थ यांना हटवण्याची मागणी केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थिनींचे कपड्यांवरील शेरेबाजी, मानसिक त्रास, गैरवर्तनाच्या घटना, प्रशासन, शिस्त याबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. या तक्रारींची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी दिवसभर विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिध्दार्थ यांची चौकशी सुरू होती. -----------------विद्यार्थिनींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावरच विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीकडून शनिवारी अनुपम सिध्दार्थ यांच्यावरील तक्रारींची चौकशी सुरू होती. या समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार कुलगुरूंनी त्यांना सखोल चौकशी होईपर्यंत रजेवर पाठविले आहे. - डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ --------------------

टॅग्स :PuneपुणेsymbiosisसिंबायोसिसCrime Newsगुन्हेगारी