शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 7:33 PM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदारकीची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली...

ठळक मुद्देबारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी खासदार शेट्टी यांच्यामध्ये चर्चा

बारामती : राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणुन लवकरच १२ जणांना राजकीय लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातुन माजी खासदार राजु शेट्टी यांना ही राजकीय लॉटरी लागल्याचे मंगळवारी(दि १६) स्पष्ट झाले.बारामती येथील शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी याबाबत बैठक पार पडली.यावेळी बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे,शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे,स्वाभिमानी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण उपस्थित होते. माजी खासदार शेट्टी यांनी सहा वर्षांपुर्वी याच निवासस्थानासमोर आंदोलन केले होते.त्याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मैत्रीपर्व सुरु झाल्याचे मानले जात आहे.शेट्टी आता राज्यपाल नियुक्त आमदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि माजी खासदार शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाली.त्यामध्ये शेट्टी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचा हा प्रस्ताव मान्य केल्याचे 'स्वाभिमानी' च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या निवास्थानी माजी खासदार शेट्टी यांनी आज अचानक भेट दिली. खुद्द पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. येथील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रकल्पांची यावेळी शेट्टी यांनी माहिती घेतली. पवार यांनी शेट्टी यांना स्वता:च्या गाडीतुन फिरवत विविध प्रकल्प दाखवले.लोकसभा निवडणुकीपासुन शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस— काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार जागा मिळणार आहेत.या कोट्यातुन शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी 'लोेकमत'शी बोलताना सांगितले कि,ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी खासदार राजु शेट्टी यांच्यातील आज नियोजित बैठक होती.त्यासाठी आज 'पवारसाहेबां'नी चार तास वेळ  दिला. राज्यपाल नियुक्त विधानपरीषद  आमदारांमध्ये खासदार शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे ढवाण यांनी सांगितले.————————————...साहेबांच्या राजु शेट्टींसाठी 'आमरसा'चा बेतज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी खासदार राजु शेट्टी यांना चार तासांपेक्षा अधिक वेळ दिला.यावेळी बारामती (माळेगांव) येथील 'गोविंदबाग' निवासस्थानी शेट्टी यांच्यासाठी आमरसाचा बेत होता.दुपारी जेवणामध्ये आमरसाबरोबरच वांग्याचे भरीत,भाजी,बटाट्याची भाजी,भातासह फोडणीचे वरण,चटणी,लोणचे,ठेचा,भाकरी आणि चपाती आदी पदार्थांचा समावेश होता.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवारSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारPoliticsराजकारण