शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 7:59 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे होम क्वारंटाईन झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वत: राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी क्वारंटाईनकोल्हापूर-सांगलीकरांनो कोरोनाला हरवा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे होम क्वारंटाईन झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वत: राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.राजू शेट्टी विविध कामांसाठी महाराष्ट्रात विविध कारणांसाठी फिरत असतात. यादरम्यान अनेकांशी संपर्क झाल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी करवून घेतली.

ही चाचणी निगेटिव्ह आली, परंतु गुरुवारी रात्री त्यांना थोडा ताप येउन अस्वस्थ वाटू लागल्यामुळे डॉ. सतिश पाटील यांच्याकडे त्यांनी एचआरसीटी चाचणी केली. तेव्हा फुफ्फुसात थोडा फार संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही लक्षणे कोरोनाची असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच राहून उपचार सुरु केले आहेत.शुक्रवारी सकाळी राजू शेट्टी यांनी फेसबुकसह इतर सोशल मिडियावरुन ही माहिती दिली आणि बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात, मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, त्यामुळे माझ्या संपर्कात येउन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.

कोरोना मान-सन्मान ठेवत नाही, तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षित राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुसऱ्या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील, याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे, कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या. विसरु नका, कोल्हापूर-सांगलीकरांनो कोरोनाला हरवायला.- राजू शेट्टी,संस्थापक नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSangliसांगली