शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

भाजपा महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:53 AM

राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सरकारला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करणार आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. तूर्त कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती संघटनेने आखली आहे.राज्यातील दोन्ही काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात स्वाभिमानी संघटनेचाही वाटा होता. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची महाआघाडी झाली.भाजपाचे अभयपुढे विधानसभेला भाजप व शिवसेनेच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी ‘स्वाभिमानी’ भाजपसोबत राहिली. त्याची भरपाई म्हणून संघटनेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्रिपद देण्यात आले. ते सत्तेत गेले आणि संघटनेतील दुही सुरू झाली. खोत संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सत्तेत गेले; परंतु तिथे गेल्यावर ते सरकारचेच हस्तक बनल्याने शेट्टी व खोत यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यातून संघटनेने गेल्या महिन्यांत सदाभाऊंची हकालपट्टी केली; परंतु सत्तारूढ भाजपने मात्र त्यांना अभय देत सत्तेत कायम ठेवले. उलट महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर सदाभाऊ हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाल्याचे सांगून टाकले. त्यामुळे संघटना सत्तेतून बाहेर पडणार हे स्पष्टच होते. ती बाहेर पडते की पडणार, पडणार म्हणत सत्तेला चिकटून राहते, हीच उत्सुकता होती.लाचार नाही..राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये ‘स्वाभिमानी’ने मागितल्यास मंत्रिपद देऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते; परंतु ती शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडली असे चित्र जाऊ नये यासाठी घाईने हा निर्णय घेण्यात आला असून, आम्ही सत्तेसाठी लाचार नसल्याचा संदेश त्यातून देण्याचा ‘स्वाभिमानी’चाप्रयत्न आहे.सोडचिठ्ठी देणारापहिला पक्षभाजपची राज्यात सत्ता यावी यासाठी झटलेली स्वाभिमानी संघटना अवघ्या तीन वर्षांतच सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी बसविण्याची भाषा करण्याची हिंमत अजून काँग्रेसलाही आलेली नाही आणि खासदार शेट्टी मात्र पंतप्रधानांवर तशी थेट टीका करू लागले आहेत. लोकसभेच्या प्रचारात कोल्हापुरातील सभेत मोदी यांनी शेट्टी यांचा उल्लेख ‘माझा परममित्र’ असा केला होता. ही मैत्री अल्पजिवी ठरली आहे.तूपकर राजीनामा देणारआता स्वाभिमानी शेतकरी संघटना तशी तांत्रिकच सत्तेत होती. संघटनेचे नेते रविकांत तूपकर हे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आहेत; परंतु त्यास निधीच दिलेला नाही. त्यामुळे ते आजच आपला राजीनामा संघटनेकडे सादर करण्याची शक्यता आहे. शेट्टी वगळता संघटनेचे लोकसभा व विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे संख्याबळाच्या पातळीवर सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत