शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 21:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश..

ठळक मुद्देपुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही.... साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत...

पुणे : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घश्री पोस्टाद्वारे मिळालेले संशयास्पद पत्र हे पुण्यातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, ता़. जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता दिला आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्यांचा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीबाबत तक्रार आलेली नाही, अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत लिहिलेले आहे. या पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आहे. या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पाकिटातून पाठविलेल्या पत्राबरोबर आणखी काही पाने असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश आहे. त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा करण्यात आलेल्या आहेत. तसेच फोटोसमोर या सर्वांवर बंदुक रोखल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्र व त्यासोबत आलेली पावडर ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल,असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.-------------------------------------------------हे एका पाकिटातून पाठविलेले साधे पत्र आहे. त्यामुळे त्याची नोंद नसल्याचे या पत्राचा टपाल खात्यात त्याची नोंदणी नसते. त्यामुळे या पत्राचा माग काढणे अवघड असते. शहरातील टपाल पेट्या किंवा टपाल कार्यालयात जमा होणारी पत्रे गोळा केली जातात. त्या टपालांचे राज्य, गावांनुसार वेगळी केली जातात. त्यावर शिक्के मारुन नंतर ती आरएमएस विभागाकडे पाठविली जातात. आरएमएस विभागाकडून संबंधित गावांकडे ही पत्रे पाठविली जातात. साधे पत्रांची नोंद नसल्याने ते पत्र नेमके कोणी पाठविले याची नोंद नसते.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPoliceपोलिस