शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:44 IST

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत.

अतुल कुलकर्णी -मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने षडयंत्र रचून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असा दावा निलंबित आमदार आशिष शेलार यांनी केला असला तरी, त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे मत विधिमंडळ तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. निलंबनाची प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पाडली गेली आहे. त्यामुळे हा विषय न्यायालयात गेला तरी प्रसिद्धीशिवाय भाजपच्या हाती फार काही लागणार नाही.विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना विचारले असता ते म्हणाले, रीतसर पद्धतीने मंजूर झालेल्या प्रस्तावाला आव्हान कसे देणार? हा प्रस्ताव बेकायदेशीर आहे, असे कसे म्हणणार? त्यामुळे यावर न्यायालय हस्तक्षेप करेल, असे आपल्याला वाटत नाही. या निर्णयानंतर विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. सभागृहातील कोणतेही अधिकार त्यांना असणार नाहीत. हे निलंबन सभागृहाच्या कामकाजात पुरते केले गेले आहे. 

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड ही सभागृहाच्या कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना या निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही किंवा अध्यक्षपदासाठी मतदानही करता येणार नाही. या आधी पंजाब आणि गुजरातची विधानसभा स्थगित असतानादेखील राष्ट्रपतींची निवडणूक झाली होती. त्यामुळे काही सदस्य निलंबित आहेत म्हणून निवडणूक घेता येणार नाही, अशी कोणतीही तरतूद विधिमंडळाच्या कायद्यात नाही. अध्यक्षांची निवडणूक विधानसभेच्या कामकाजाचा एक भाग आहे, असेही कळसे म्हणाले. 

तालिका अध्यक्षांचे अधिकार?- भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना अध्यक्षांचे अधिकार प्राप्त होत नाहीत, अशी चर्चाही काही आमदारांनी सुरू केली आहे. मात्र विधिमंडळाचे कायदे या बाबतीत अत्यंत सुस्पष्ट आहेत. - तालिका अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर विधानसभेत अध्यक्षांच्या आसनावर बसून कामकाज चालवत असतील, तर त्यावेळी त्यांना अध्यक्षांचे सगळे अधिकार लागू होतात. त्यावेळी ते पूर्ण अध्यक्षच असतात. त्यामुळे अशी चर्चा करून विषयांतर करण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही, असेही अनंत कळसे म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAshish Shelarआशीष शेलार