शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

500 उठाबशा काढायला लावणा-या मुख्याध्यापिकेचं निलंबन करा, आमदार कुपेकरांची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:37 IST

कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली.

नागपूर: कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांच्यावर कठोर कारवाई न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थिनिच्या प्रकृतीत अजूनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने तिला लवकरच मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी  शालेय शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याची माहिती दिली होती. तसंच या प्रकरणाची चौकशी करुन गरज पडली तर फौजदारी कारवाई केली जाईल असं विनोद तावडेंनी सांगितलं होतं. विद्यार्थिनीवर उपचार सुरू, पण मुख्याध्यापिकेवर अद्याप कारवाई नाही -गृहपाठ केला नाही म्हणून कोल्हापूरात एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला.  300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली. तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली असून तिच्यावर सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.दरम्यान, शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीTeacherशिक्षक