नाशिक : मालेगाव येथे फळविक्रेत्यास बेदम मारहाण करून सहा हजारांची खंडणी वसूल करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले.शेख अकबर शेख शकील (२०) याने गेल्या शनिवारी आयेशानगर पोलिसांत फिर्याद दिली होती. शेख अकबर याचा फळविक्री व मोटार सायकल खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्याच्या विरोधात आयेशानगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यास गेला असता त्यास पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, पोलीस नाईक भूषण पवार, पोलीस कर्मचारी रवींद्र बच्छाव, हरिष पवार यांनी त्यास बेदम मारहाण करून दहा हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती त्याच्याकडून सहा हजार रुपये वसूल केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून हातापायावरही मारहाणीच्या खुणा होत्या, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)
पोलीस उपनिरीक्षकासह चौघे निलंबित
By admin | Updated: June 6, 2015 01:18 IST