गुलाबरावांवर कारवाईसाठी चाकणकरांना दोनदा फोन केला होता, पण...; सुषमा अंधारेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:14 IST2022-11-08T15:58:00+5:302022-11-08T16:14:31+5:30
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारावाईसाठी मी दोनवेळा रुपाली चाकणकर यांना फोन केला होता, पण त्यांनी फोन उचलला नाही, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

गुलाबरावांवर कारवाईसाठी चाकणकरांना दोनदा फोन केला होता, पण...; सुषमा अंधारेंचा आरोप
मुंबई- मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारावाईसाठी मी दोनवेळा रुपाली चाकणकर यांना फोन केला होता, पण त्यांनी फोन उचलला नाही, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'नटी' या शब्दाचा वापर केला होता. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप ससुरू होते.
काल शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली. यावरुन सुषमा अंधारे यांनी आयोगावर आरोप केला आहे. मीही तक्रारासाठी फोन केलेला पण रुपाली चाकणकर यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान!
मंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार सुळेंवर टीका
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले . यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.