१४ लाखांचे बक्षिस असलेल्या ५ जहाल नक्षलवादयाचे आत्मसमर्पण
By Admin | Updated: July 26, 2016 15:55 IST2016-07-26T15:55:30+5:302016-07-26T15:55:30+5:30
गडचिरोली जिल्ह्यात १४ लाखाचे बक्षिस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

१४ लाखांचे बक्षिस असलेल्या ५ जहाल नक्षलवादयाचे आत्मसमर्पण
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली जिल्ह्यात १४ लाखाचे बक्षिस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. या पाचही जणांनी गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार लाखाचे बक्षिस असलेला प्लाटून क्रमांक ३ सदस्य कालिदास उर्फ रामलाल सरदार हुपुंडी व प्लाटून क्रमांक १५ सदस्य जागेश उर्फ दुल्लुराम जिटीराम हिडको तसेच प्रत्येकी दोन लाखाचे बक्षिस असलेले गट्टा एरिया सीएनएम टीमचे सदस्य जीवन उर्फ छबीलाल बिपतराम मडावी, सप्लाय टीम सदस्या अंकिता उर्फ जानकी वत्ते पदा व मिलिशीया सदस्य सुखराम लालुराम वड्डे यांचा समावेश आहे. यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला प्रचंड हादरा बसला असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.