शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:03 IST

"खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे..."

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातही प्रचार रंगात आला आहे. येथे काका अजित पवार विरुद्ध पतण्या युगेंद्र पवार, असे एकाच पवार कुटुंबातील दोन सदस्य समोरा-समोर आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती विधानसभेकडे लागले आहे. दरम्यान, "लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल की, परत कुणी वाली राहणार नाही," असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामतीकरांना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रितिक्रिया देताना "कुणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही," असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.अजित पवार यांच्या 'वाली' या वक्तव्यावर टीव्ही९ मराठीसोबत बोलताना सुळे म्हणाल्य, "ते अजित पवार आहेत, सर्वांना त्यांच्या बोलण्याची पद्धत माहीत आहे. त्यामुळे 'राम कृष्ण हरी'. खरे तर, कोणीही कुणाच्यानंतर मी, असे भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे की माननीय मोदीजी आणि अमित शहा यांनीही १०० नाही २०० वर्षं जगावे. म्हणून, ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असले, तरी माझी इच्छा आहे की त्यांच्या सर्व नेत्यांनी १००-२०० वर्ष जगावे. आम्ही सर्वांनी लढावे. पण ही भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही."

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, हे गेले दोन महिने आम्ही सातत्याने बोलतो आहोत. आमच्यात एकसूत्रता आहे आणि एकदा आम्ही एखादी विचारधारा किंवा निर्णय घेतला की, आम्ही त्याच ट्रॅकवर राहतो, हे तुम्ही आमच्या सर्व मुलाखतींमध्ये बघितले असेल. त्यामुळे, गेली दोन महिने आम्ही हेच सांगत आहोत," असेही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले होते अजित दादा? -"लोकसभेला काहीतरी गंमत केली, पण ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही? काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही."

"साहेबांनी सांगितलं, दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे, याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे?" असा सवालही अजित पवार यांनी यावेली बारामतीकरांना केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती