सुप्रिया सुळे यांनी घडवला अजित पवार-खडसे संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:52 IST2020-10-24T09:51:33+5:302020-10-24T09:52:18+5:30
खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. काही प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावर स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, पक्षातील अनेकांना कोरोनाची लागण झाली.

सुप्रिया सुळे यांनी घडवला अजित पवार-खडसे संवाद
मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत; मात्र त्यांनी व्हीडिओ कॉलवरुन खडसे यांचे पक्षात स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याशी व्हीडिओ कॉलवरुन बोलणे करून दिले.
खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. काही प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावर स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, पक्षातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरेही झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार काळजी घेत आहेत. खडसे यांना जितेद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावरही पवारांनी खुलासा केला असून सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. खडसे हे कोणत्याही पदासाठी पक्षात आलेले नाहीत, असेही ते म्हणाले.