शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:36 IST

हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागणार

ठळक मुद्देयंदा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्याचा पहिला फटका इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.परिणामी यंदा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी ) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.   

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशातर्फे राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या आदेशानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.मात्र,या निर्णयामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी प्रवेश समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाखाहून अधिक जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या दुस-या नियमित फेरीची गुणवत्ता यादी १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार होती.परंतु,न्यायालयाच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेची पूर्ण कार्यवाही थांबविण्यात आली.

 मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रकियेतून एसईबीसी प्रवर्गाचा कटआॅफ खुल्या प्रवर्गाच्या कटआॅफ पेक्षा कमी होता.त्यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.यंदा राबविण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीतही तसेच चित्र दिसून येत आहे.त्यामुळे एसईबीसीतून प्रवेशाची संधी मिळाली नाही तर अनेक विद्यार्थ्यांचा तोटा होणार असल्याचे उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येत आहे.मागील वर्षी बीएमसीसीमध्ये वाणिज्य शाखेत खुल्या संवर्गाचा कटआॅफ ४७४ होता तर एसईबीसीचा कटआॅफ साठी ४३८ होता.-------------------------------------   खुल्या व एसईबीसी संवर्गाचा कटआॅफ (वर्ष २०१९-२० )विज्ञान शाखामहाविद्यालयाचे नाव खुला संवर्ग एसईबीसी संवर्गआपटे प्रशाला ४७८ ४५३मॉडर्न कॉलेज ४५३ ४०८आबासाहेब गरवारे ४४८ ३८०फगर््युसन कॉलेज ४८० ४४६नौरोसजी वाडिया ४२६ २५३अशोक विद्यालय ४५५ २८७स.प.महाविद्यालय ४५६ ३८७सिंबायोसिस ४२३ २९०

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणcollegeमहाविद्यालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार