शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:13 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा ठराव बुधवारी पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. लोकशाही विरोधी सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले.मराठा सेवा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, शहराध्यक्ष हर्षवर्धन मुगदूम, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुधीर पुंडे, जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, प्राची दुधाने, डॉ सुनिता मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये अनेक पदाधिकाºयांनी भाषणे केली. त्यानंतर  काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाठींबा देण्याचा ठराव मांडण्यात आला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, उमेदवारी मिळाली नसली तरी लोकशाहीला घातक असलेले सरकार घालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून करोडो लोक रस्त्यावर आले. याबरोबरच बहूजन, दलित मोर्च्याच्या माध्यमातूनही लाखो लोक रस्त्यावर आले. लोकांचा राज्यकर्त्यांवर विश्वास राहीलेला नाही. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही मांडतो. मात्र, पुरोगामी पक्षांकडून अशा चळवळीतील लोकांना पद मिळत नाही. आपल्या चळवळींचा ज्या पक्षांना फायदा होतो. त्यांच्याकडूनही चळवळीतल्या लोकांना अपेक्षित फायदा झालेला नाही. असे असले तरी देशातील लोकशाहीला घातक असलेल्या पक्षाला सरकारबाहेर काढण्यासाठी महाआघाडीला पाठिंबा देत आहोत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.-------------

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण