शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

ठाण्याचे अधीक्षकपद दीड महिन्यापासून रिक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 4:13 AM

राज्य शासनाला एकट्या ठाणे जिल्ह्यातून वर्षभरातून सुमारे १०० कोटींचा महसूल मिळवून देणा-या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षकपद गेल्या दीड महिन्यापासून रिक्तच आहे. याठिकाणी येण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची नियुक्ती करतात...

- जितेंद्र कालेकरठाणे  - राज्य शासनाला एकट्या ठाणे जिल्ह्यातून वर्षभरातून सुमारे १०० कोटींचा महसूल मिळवून देणा-या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षकपद गेल्या दीड महिन्यापासून रिक्तच आहे. याठिकाणी येण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची नियुक्ती करतात, याकडेच राज्यभरातील या विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष लागले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक एन.एन. पाटील हे जानेवारी २०१८ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर म्हणजे १ फेब्रुवारीपासून राज्यभरात ज्येष्ठ असलेल्या अधीक्षकाची ठाण्यात नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, कोणाचीही नियुक्ती न झाल्यामुळे पालघरचे अधीक्षक विठ्ठल लेंगरे यांच्याकडे पालघरसह ठाण्याचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ए, बी, सी, डी, ई आणि एफ (ठाणे आणि नवी मुंबई) तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडीसह दोन भरारी पथके अशा १३ विभागांचा कारभार आहे. याठिकाणी १३ निरीक्षक आणि दोन उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. जिल्हाभरातील देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून १०० कोटींचा महसूल एकट्या ठाणे जिल्ह्यातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत ९५ कोटींचा महसूल ठाण्यातून जमा झाला आहे. मार्चअखेरपर्यंत यात आणखी १० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. वरील सर्व अधिकाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाण्याला स्वतंत्र तसेच कायमस्वरूपी अधीक्षकाची गरज असताना तो पदभार पालघरचे अधीक्षक लेंगरे यांच्याकडे अतिरिक्त सोपवण्यात आला आहे. एकाच वेळी पालघर आणि ठाण्याचा पदभार पाहताना लेंगरे यांची मात्र चांगलीच कसरत होते. त्याऐवजी राज्यभरात ज्येष्ठ असलेल्या एखाद्या अधीक्षकाची ठाण्यात स्वतंत्र पदभाराने नियुक्ती व्हावी, अशी जिल्ह्यातील अधिकाºयांची अपेक्षा आहे.स्पर्धेमुळे नियुक्ती लांबणीवर?मुंबईपासून जवळ असलेल्या पूर्वीपासूनच प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाण्याच्या जागेसाठी वरिष्ठ अधीक्षकांपासून नव्यानेच अधीक्षक म्हणून रुजू झालेल्यांनाही ठाण्याचे आकर्षण असते. त्यामुळे मुंबईपाठोपाठ उर्वरित महाराष्टÑातील या ठाणे जिल्ह्यात येण्यासाठी अनेक अधिकारी उत्सुक असतात. अधिका-यांमधील या स्पर्धेमुळेच या ठिकाणची नियुक्ती नेहमीच लांबलेली असते, असेही एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.यापूर्वीही जळगावकडे अतिरिक्त कारभार!तत्कालीन अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या बदलीनंतर २०१५ मध्येही जळगावचे अधीक्षक एन.एन. पाटील यांच्याकडे २ मार्च २०१५ ते ५ जून २०१५ या कालावधीत ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपवला होता. ६ जून २०१५ पासून त्यांना ठाण्यात नियमित करण्यात आले. ३१ जानेवारी २०१८ मध्ये ते निवृत्त झाल्यापासून मात्र पालघरच्या अधीक्षकांकडे पुन्हा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेGovernmentसरकार