सुपर ‘एक्सप्रेस हायवे’चे सर्व्हेक्षण करणारे ‘ड्रोन’ शेतात कोसळले!
By Admin | Updated: August 8, 2016 22:47 IST2016-08-08T22:47:56+5:302016-08-08T22:47:56+5:30
सुपर एक्सप्रेस हायवे काम करण्याच्या पाहणीसंदर्भात वापरण्यात येत असलेले ‘ड्रोन’ जऊळका रेल्वे येथील एका शेतात कोसळल्याची घटना ८ आॅगस्ट रोजी ६ वाजता दरम्यान घडली.

सुपर ‘एक्सप्रेस हायवे’चे सर्व्हेक्षण करणारे ‘ड्रोन’ शेतात कोसळले!
>ऑनलाइन लोकमत
जऊळका रेल्वे, दि. 08 - सुपर एक्सप्रेस हायवे काम करण्याच्या पाहणीसंदर्भात वापरण्यात येत असलेले ‘ड्रोन’ जऊळका रेल्वे येथील एका शेतात कोसळल्याची घटना ८ आॅगस्ट रोजी ६ वाजता दरम्यान घडली.
जऊळका रेल्वे येथील १८ वर्षिय युवक सुरज हरिदास तायडे व त्याचा मित्र शेतात काम करीत असतांना आकाशातून विमानासारखा आवाज जो-याने आल्याने यांचे लक्ष त्याकडे गेले. पाहता पाहता त्यांनी विमान पडले...विमान पडले म्हणून त्याच्याकडे धाव घेतली. लगेच सोबत असलेल्या मित्राने खेळण्यातले विमान आहे म्हणून त्याने सुरजला घरी घेवून जाण्याचा सल्ला दिला. दहा किलोच्या जवळपास वजन असलेले हे विमान दोघांनी घरी घेवून गेलेत. ताबडतोब दहा ते पंधरा मिनिटाचं तेथे या ड्रोनव्दारे सुपर एक्सप्रेस हायवेची पाहणी करणारे पथक घटनास्थळी पोहचले. ड्रोनमध्ये कॅमेरे असल्याने पथकाला वाहनात असलेल्या लॅपटॉपमध्ये सर्व दिसत होते. ते त्या ड्रोनच्या मागेच असल्याने ते पोहचल्यावर या मुलाचा शोध घेतला तेव्हा आधी सुरजने आपल्या काही माहिती नसल्याचे सांगितले. पथकाने त्याला लॅपटॉपमधील सर्व चित्र व व्हिडीओ दाखविल्यानंतर ड्रोन परत केल