शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:30 IST

Sunil Tatkare : आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.

कर्जत - आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाची पाठराखण करतानाच शरद पवार यांनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांचा संदर्भ देत हा निर्णय का घेतला त्याचे समर्थन केले.

ध्वजारोहण झाल्यावर या शिबिराला सुरुवात झाली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘संकट काळात आमच्या पाठीशी पक्ष उभा राहिला नाही’२०१४ मध्ये भाजपने न मागताच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. २०१६ मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. तो ऐनवेळी फिरवण्यात आला. पहाटेच्या शपथ विधीबाबतही अजित पवार यांनाच खलनायक ठरवले गेले. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हाही भाजपसोबत जाण्याबाबत निवेदन तयार केले होते. त्यावर तर फुले-शाहू महाराज-आंबेडकरांचे एकमेव वारस असल्याचा दावा करणाऱ्या ठाण्यातील नेत्यांचीही सही होती, असे तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेता स्पष्ट केले. नंतरही आघाडी सरकारमध्ये अजित पवार, मी, छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा पक्ष पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत तटकरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप याच महिन्यात पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणीदरम्यान अजित पवार यांचा भेकड, असा उल्लेख केला, पण त्यांचे नेतृत्व सक्षम आहे म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यासोबत आहेत, याकडे तटकरेंनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. देशात भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, आपल्या वैचरिक भूमिकेशी तडजोड करत नाहीत. मग आम्हीही तसे पाऊल उचलले तर ते चुकीचे कसे, असा प्रश्नही तटकरेंनी विचारला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार