राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 19:56 IST2018-04-26T19:56:38+5:302018-04-26T19:56:38+5:30
प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबद्दल उत्सुकता

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे यांची निवड केली असून तसं पत्र पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी सुनिल तटकरे आणि प्रदेश कार्यालयात पाठवलंय.
गेली 4 वर्षे सुनिल तटकरे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. तटकरे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जात असल्याचं राष्ट्रवादीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. तटकरेंची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यानं प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालंय. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.